छत्रपती संभाजी महाराज उद्यान
जालना शहरात छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव उद्यान आहे. – इथे मुलांना खेळण्यासह वृद्धांना सायंकाळी फिरण्यासाठी उत्तम सोय आहे. – सायंकाळी चार ते साडेसात यावेळी हे उद्यान सुरू असते. – या उद्यानात प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
संभाजी उद्यान हे १९७४ ते १९७८ या कालावधीत पूर्ण झाले. – येथे लहान मुलांना खेळण्यासाठी विविध साधनसामुग्री आहे. – उद्यानाच्या मागील बाजुला मोती तलाव आहे. – सायंकाळी अनेक जण कुटूंबासह येथे वेळ घालवितात. – विशेष करून शनिवार, रविवारसह सुटीच्या दिवशी येथे अधिक गर्दी असते. – पावसाळ्याच्या शेवटी तसेच हिवाळ्यात या उद्यानात दिवसभर गर्दी असते.
हे उद्यान अंबड चौफुली ते औरंगाबाद चौफुली मार्गावर आहे. त्यामुळे येथे आॅटोरिक्षाने किंवा स्वतःच्या वाहनाने जाणे शक्य आहे.
पत्ता : छत्रपती संभाजी उद्यान मोती तलाव जवळ, जालना. ता.जि. जालना
मोतीतलाव