नरसी नामदेव – संत नामदेव महाराज संस्थान
नरसी (नामदेव) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यामधील हिंगोली जिल्ह्यातील एक गाव आहे. या गावी संत नामदेवांचा जन्म झाला.[१]या गावाशेजारून कयाधू नदी वाहते. त्या नदीकाठी संत नामदेवांचे मंदिर आहे.हिंगोली पासुन १५ ते २० किमी आहे, एक वेळ नक्की भेट द्या.
हिंगोली जिल्ह्यातील संत नामदेव महाराजांची ही पावन भूमी नरसी नामदेव इथली मिठाची यात्रा पहिल्यांदाच मिठा विनाच साजरी होतेय. या यात्रेत पैशाऐवजी धान्य, तेलबिया, मीठ खरेदी करण्याची प्रथा आहे. यात्रेत खरेदी केलेलं मीठ पौष्टिक आणि पवित्र मानलं जातं.
- पापमोचनी एकादशीस ( मार्च-एप्रिल महिना) मिठाची यात्रा भरते. त्यावेळी, येथे धान्याच्या मोबदल्यात मीठ खरेदी करण्याची परंपरा आहे.
- आषाढी एकादशीची यात्रा व आषाढीनंतर येणाऱ्या एकादशीला परतवारी सोहळा असल्याने लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.
- – आषाढी एकादशी यात्रा – या यात्रेनंतर पंधरा दिवसांनी येणाऱ्या एकादशीला परतवारी महोत्सव हाेताे. – हा येथील सर्वात मोठा महोत्सव असतो. – पापमोचनी एकादशीनिमित्त भरणारा यात्रा महोत्सव गुढी पाडव्यापासून सुरू हाेताे.
हिंगोली ते रिसोड मार्गावर नरसी नामदेव थांबा आहे. येथे सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे. हिंगोली येथून नरसी नामदेव येथे जाण्यासाठी बस, खासगी वाहने उपलब्ध आहेत. हिंगोली ते नरसी हे अंतर २० किलोमीटर आहे.
पत्ता : संत नामदेव महाराज संस्थान, नरसी नामदेव, ता. जि. हिंगोली
करुणा त्रिपदी स्मारक, नरसी नामदेव