उदगीर हत्तीबेट-देवर्जन

लातूर जिल्ह्य़ाच्या उदगीर तालुक्यात मौजे हत्ती बेट नावाचं ठिकाण उदगीर शहराच्या पश्चिमेस १६ किमीवर वसले आहे. हत्ती बेटाला पुरातन काळापासून महत्त्व प्राप्त झालं आहे. या ठिकाणी पुरातन मंदिरांबरोबरच गुहा, कोरीव शिल्पं मोठय़ा प्रमाणात पाहावयास मिळतात. हत्ती बेट देवर्जनाला प्रादेशिक पर्यटनाचा दर्जा मिळाला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राममध्ये रझाकारांविरुद्ध स्वातंत्र्यसैनिकांनी युद्ध करून शेवटपर्यंत हत्ती बेट रझाकारांना जिंकू दिलं नाही असा इतिहास इथं सांगितला जातो. हत्ती बेटावर दत्ताचं मंदिर आहे तसेच गंगाराम महाराजांची समाधी आहे. लोकांच्या श्रद्धेचा भाग असलेल्या या ठिकाणाला आसपासच्या गावांतून तसेच शेजारच्या राज्यांतून मोठय़ा प्रमाणात भाविक भेट देत असतात. पौर्णिमेला इथं भजन, कीर्तन आणि प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.

हत्ती बेट पूर्वी उजाड आणि बोडका डोंगर होता. इथली जमीन निकृष्ट दर्जाची असल्याने नैसर्गिक झाडं डोंगरावर नव्हती. हे वन क्षेत्र मौजे हणमंतवाडी, धर्मापुरी, करवंदी आणि देवर्जन या गावांच्या सीमेलगत असून त्याचं क्षेत्र ४१ हेक्टर एवढं आहे. लोकांनी ठरवलं, प्रशासनाला लोकांनी आणि गावकऱ्यांनी साथ दिली तर किती उत्तम काम होऊ शकतं याचं हत्ती बेट हे एक उत्तम उदाहरण आहे. या सर्वानी मिळून या उजाड बोडक्या डोंगरावर हिरवाई फुलवली आहे. त्याचं रूपडंच पालटून टाकलं आहे.

वर्षाचा सर्वोत्तम वेळ

January – January

दत्तजयंतीनिमित्त हत्तीबेटावर मोठी यात्रा भरते. दर महिन्याच्या एकादशीस कीर्तन व भजनाची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. शिवाय दर पौर्णिमेस आरती, जप, महाप्रसादाच्या कार्यक्रमास हजारो भक्तगण हत्तीबेटावर येत असतात.

या बेटावर उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीनही मोसमात पर्यटक व भाविकांची नेहमीच वर्दळ असते.

दत्त जयंती, दर पौर्णिमा, एकादशी

कसे पोहोचाल?:

विमानाने
या ठिकाणाजवळ पोहोचण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ आहे पुणे (370 कि.मी.), हैदराबाद (2 9 8 किमी), औरंगाबाद (264 किमी).

रेल्वेने
लातूर जिल्हा रेल्वे मुंबई (430 कि.मी.), पुणे (338 कि.मी.), नांदेड (186 किमी), हैदराबाद (243 कि.मी.) जोडलेला असून येथे रेल्वेगाड्यांची सुविधा आहे .रेल्वे स्थानक लातूर रेल्वे स्टेशन, लातूर रोड रेल्वे स्टेशन आणि लातूर हेडक्वाटर्स अंतर्गत हरंगुल रेल्वे स्टेशन्स आहे.

रस्त्याने
कोणत्याही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकमधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत.राष्ट्रीय महामार्ग 62 लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातून जातो.

मौजे हत्ती बेट उदगीर शहराच्या पश्चिमेला १६ किमी अंतरावर आहे.

पत्ता : हत्तीबेट (देवर्जन), ता.उदगीर, जि.लातूर –
उदगीर शहर

Similar Posts