येलदरी धरण

येलदरी धरणामुळे परभणी, जिंतूर, वसमत या शहरांसह हिंगोली जिल्ह्याचा पाणीप्रश्नही सुटला आहे. परभणी आणि हिंगोली या जुळ्या जिल्ह्यांचे सर्व काही याच धरणावर अवलंबून आहे म्हणा ना! येलदरी धरण पूर्णा नदीवर बांधलेले आहे. पूर्णा ही गोदावरीचीच एक प्रमुख उपनदी आहे. जिंतूरपासून 15 किलोमीटर तर परभणीपासून 57 किलोमीटरवर आहे.जिंतूर तालुक्यातील येलदरी या गावाजवळ धरण उभारण्यात आले असून हिंगोलीच्या वायव्येला हिंगोली-जिंतूर मार्गावर येते.

येलदरी धरणाचे उद्दिष्ट शेतीसाठी पाणी पुरविणे आणि वीज निर्मिती हे होते, परंतु आता परभणी आणि हिंगोलीतील अनेक शहरे पिण्याच्या पाण्यासाठी याच धरणावर अवलंबून आहेत. येलदरीच्या वरच्या बाजूला असलेले खडकपूर्णा धरण भरले की, येलदरी धरणात पाणी सोडण्यात येते. त्यामुळे परभणीकरांचे डोळे नेहमीच खडकपूर्णा धरण भरले की, नाही याकडे लागलेले असते. येलदरी धरणाचे बांधकाम 1958 मध्ये सुरू झाले होते. हे धरण पूर्ण होण्यास 1968 उजाडले. एकूणच बांधकामास तब्बल दहा वर्षे लागली.

  • – धरणालगत पर्यटकासाठी दोन कोटी 99 लाख रुपये खर्चून मोठ्या उद्यान निर्मितीचे काम चालू आहे. – लहान मुलांसह पर्यटक या उद्यानास भेट देण्यासाठी येतात. – खेळणी, प्राण्यांचे पुतळे असे विविध साहित्य उद्यानात आहेत.
  • – येलदरी धरण परिसरात राहण्याची चांगली व्यवस्था नाही.
  • – जेवणासाठी छोटे हॉटेल आहेत. त्याठिकाणी मांसाहारी जेवण मिळते.

येलदरी धरणाकडे जाण्यासाठी मुख्य शहराकडून परभणी-फाळेगाव राज्य रस्ता क्र. 217 आहे. जिंतूर शहरापासून पूर्वेला 15 किमी अंतरावर आहे.

पत्ता : येलदरी प्रकल्प ता. जिंतूर, जिल्हा परभणी – 431509
येलदरी

Similar Posts