भद्रा मारुती मंदिर
भद्र मारुती मंदिर, हे खुलदाबाद (प्राचीन मूळ नाव भद्रावती) येथील हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे. हे औरंगाबाद जवळ खुलताबाद येथे स्थित आहे. हे मंदिर वेरुळ लेण्यापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. हे स्थान हिंदू धर्मियांसाठी अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. येथील मारूती नवसाला पावणारा असून हे अत्यंत जागृत असे स्थान आहे. येथील मूर्ती शयनावस्थेत आहे. शयनावस्थेत असलेल्या हनुमानाची अजून दोन ठिकाणे आहेत ती म्हणजे प्रयागराज येथील मंदिर व आणि तिसरे मध्य प्रदेशातील जाम सवाली येथे आहे. भद्रा मारुती मंदिर हे औरंगाबाद जवळील पर्यटकांचे एक आकर्षण मानले जाते. हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी आणि राम नवमी अशा शुभ प्रसंगी येथे लोक लाखोंच्या संख्येने जमा होतात. श्रावण महिन्यात शंकराच्या पूजेला महत्त्व असते. हनुमानही महादेवाचे रूप असल्याने शनिवारी शिवभक्त भद्र मारुतीच्या दर्शनाला येतात.
कथा
भद्रावती येथे भद्रसेन नावाचा एक थोर राजा होता. हा रामाचा उत्कट भक्त होता आणि त्याच्या स्तुतीमध्ये गाणी गात असे. एके दिवशी हनुमानजी आकाशातून जात असतांना त्यांना ही गाणी ऐकू आली. रामाच्या स्तुतीमध्ये गायली जाणारी ही भक्तीगीते ऐकत त्या ठिकाणी उतरले. ते मंत्रमुग्ध झाले. आणि अनुमानाने एक भव्य योगमुद्रा धारण केली. त्याला ‘भाव समाधी’ असे म्हणतात ( भाव समाधी ही योगिक मुद्रा आहे). राजा भद्रसेनाने गाणे संपविले तेव्हा प्रत्यक्ष हनुमानाची मूर्ती पाहून आश्चर्यचकित झाला. त्याने नमस्कार करून हनुमानाला तेथे कायमचे वास्तव्य करून आपल्या आणि भगवान राम भक्तांना आशीर्वाद देण्याची विनंती केली. अशा रितीने हनुमान भद्र म्हणजे शांत मुद्रेत तेथे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी कायमचा थांबला आहे.
दरवर्षी भद्रा मारुती मंदिर देशभरातून हिंदू देवता भगवान हनुमानाच्या भक्तांना आकर्षित करते. लोककथेनुसार, खुलदाबाद हे एकेकाळी भद्रावती म्हणून ओळखले जात असे आणि त्यावर राजा भद्रासनाचे राज्य होते.
एकदा राजा रामासाठी भक्तिगीत गात असताना, तो प्रभूचा भक्त असल्याने हनुमान तेथे आला आणि ते गाणे ऐकून त्याला इतका आनंद झाला की तो तेथेच झोपला. त्यामुळे हनुमानाच्या मंदिरातील मूर्ती ही निद्रावस्थेत आहे.
भद्रासनाने स्वामींना या ठिकाणी आशीर्वाद देण्याची विनंती केली. हे निर्मळ मंदिर औरंगाबादमध्ये भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे, कारण ते प्रसन्न तसेच करिष्माई आहे.
- ठिकाण : खुलदाबाद, औरंगाबाद
- वेळः सकाळी 5 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 9
- प्रवेश शुल्क: मोफत प्रवेश