जायकवाडी धरण
जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामधील एक प्रमुख धरण असून मराठवाड्यातील जवळजवळ २.४० लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेलं जायकवाडी धरण(Jayakwadi dam). ६० किलोमीटरची लांबी आणि दहा किलोमीटरची रुंदी इतका मोठा पसारा असलेल्या या नाथसागराची आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख आहे. जायकवाडी धरणाची तब्बल १०२ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे. हे धरण एकदा पूर्ण भरलं तर दोन वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि ४ वर्षांच्या पिण्याची पाण्याची सोय होते. म्हणून या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र समजला जातो.
नाथसागरावर अवलंबून क्षेत्र :-
नाथसागरावर मराठवाड्यातील पाच जिल्हे अवलंबून असतात. औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि नांदेड हे जिल्हे जायकवाडी धरणावर थेट अवलंबून आहेत. तर परळी इथलं वीजनिर्मिती करणारं थर्मल सुद्धा याच पाण्यावर अवलंबून असतं
जायकवाडी धरणाला उजवा आणि डावा असे दोन कालवे आहेत. या कालव्यातून मराठवाड्यातल्या पाचही जिल्ह्यातील शेतीसाठी पाणी सोडलं जातं. यातल्या डाव्या कालव्याची लांबी ही तब्बल 208 किलोमीटर आहे
जायकवाडी धरणातून तब्बल अडीच ते तीन लाख हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी पाणी सोडलं जातं. याच धरणावर औरंगाबाद आणि जालना या दोन महानगराच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. तब्बल 400 गावांची तहानही जायकवाडी धरण भागवतं
औरंगाबादमधील वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, पैठण आणि जालना औद्योगिक वसाहती सुद्धा याच धरणावर अवलंबून आहेत. त्यामुळे जायकवाडी धरण भरणं म्हणजे मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणे असंही समजलं जातं.
धरणाची माहिती
- बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
- उंची : ४१.३ मी. (सर्वोच्च)
- लांबी : ९९९७.६७ मी.
धरणाचा इतिहास
दरवाजे
- प्रकार : S – आकार
- लांबी : ४७१ मी.
- सर्वोच्च विसर्ग : २२६५६ घनमीटर / सेकंद
- संख्या व आकार : २७, (१२.५० X ७.९० मी)
पाणीसाठा
- क्षेत्रफळ : ३५० वर्ग कि.मी.
- क्षमता : २९०९ दशलक्ष घनमीटर
- वापरण्यायोग्य क्षमता : २१७० दशलक्ष घनमीटर
- ओलिताखालील क्षेत्र : ३५००