खरोसा लेणी
खरोसा लेणी, ही लेणी लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातील खरोसा या गावात आहे. लातूर-निलंगा रस्त्यावर लातूरपासून ४५ किमी अंतरावर व धाराशिव लेण्यांपासून सु. ८२ किमी. अंतरावर ही लेणी आहेत. लेण्यांच्या पायथ्याशी असणाऱ्या खरोसा या गावामुळे ही लेणी ‘खरोसा लेणी’ म्हणून प्रसिद्ध आहे. एका जांभा (लॅटेराइट) खडकाच्या डोंगराच्या मध्यावर ही लेणी कोरण्यात आलेली आहेत. यामध्ये एकूण १२ लेणींचा समुह आहे. डोंगराच्या दुसऱ्या बाजूस रेणुकादेवीचे मंदिर आहे.
इतिहास
सर्वप्रथम जेम्स बर्जेस या स्कॉटिश अधिकाऱ्याने या लेण्यांकडे विद्वानांचे लक्ष वेधले.कल्पसमूह या मराठी ग्रंथात रसविद्येला उपकारक ठरणाऱ्या स्थानांमध्ये ‘खरोसा’ या स्थानाचा एक संदर्भ सापडतो. लकोला लेण्याचा तलविन्यास व सामान्य वैशिष्ट्ये पाहता हे लेणे बदामी येथील तीन हिंदू लेण्यांसारखेच आहे. त्यामुळे जेम्स फर्गसन व बर्जेस यांनी या लेण्याचा कालखंड सहाव्या शतकाचा उत्तरार्ध मानला आहे. त्यांच्या मतानुसार एकंदरीत खरोसा येथील लेणी सु. इ. स. ५०० ते ७०० दरम्यान खोदण्यात आली. या दरम्यान या भागावर बदामी चालुक्य घराणे राज्य करीत होते. विराज शाह यांच्या मते, खरोसा येथील जैन लेणे सु. ८-९ व्या शतकात खोदण्यात आले असावे. खरोसा येथील लेणीसंभार पाहून पूर्वमध्ययुगात असलेले खरोसा लेण्यांचे महत्त्व अधोरेखित होते.
सद्य स्थिती
लेण्यांच्या डोंगरमाथ्यावर नंतरच्या काळातील रेणुका मातेचे मंदिर, तसेच एक दर्गा आहे. या लेणी समूहात ‘महादेव’ आणि ‘लकोला’ नावाची लेणी वैशिष्ट्यपूर्ण असून इतर लेणी दुय्यम प्रकारची आहेत.
दोन मजली लेणी
पहिली लेणी एक बौद्ध लेणी आहे, ज्यामध्ये भगवान बुद्ध यांच्या बसलेल्या स्थितीत मूर्ती आहे. बुद्धाची मुर्ती नवीन आहे, मुर्तीला रंग केलेला आहे. दुस-या लेणींमध्ये शिवलिंग आहे आणि बरेच लोक श्रद्धेने भेट देतात. बऱ्यात लेण्यांमध्ये मोठी मोठी शिवलिंग दिसतात. लेण्यांमध्ये पौराणिक कलाकृती कोरलेल्या दिसतात. काही लेण्या या अपुर्ण अवस्थेत दिसतात. खडक फार मजबुत नसल्यामुळे काळाच्या ओघाने लेण्यांची बरीच झीज झालेली आहे. सध्या काहीच कलाकृती या व्यवस्थीत दिसतात.
कसे पोहोचाल?:
विमानाने
या ठिकाणाजवळ पोहोचण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ आहे पुणे (370 कि.मी.), हैदराबाद (2 9 8 किमी), औरंगाबाद (264 किमी).
रेल्वेने
लातूर जिल्हा रेल्वे मुंबई (430 कि.मी.), पुणे (338 कि.मी.), नांदेड (186 किमी), हैदराबाद (243 कि.मी.) जोडलेला असून येथे रेल्वेगाड्यांची सुविधा आहे .रेल्वे स्थानक लातूर रेल्वे स्टेशन, लातूर रोड रेल्वे स्टेशन आणि लातूर हेडक्वाटर्स अंतर्गत हरंगुल रेल्वे स्टेशन्स आहे.
रस्त्याने
कोणत्याही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकमधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत.राष्ट्रीय महामार्ग 62 लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातून जातो.
लामजना-निलंगा रोडवर खरोसा लेणी दोन किमीवर अंतरावर आहे.
पत्ता : खरोसा लेणी, खरोसा-निलंगा रोड, ता.औसा.जि.लातूर 413521
लामजना-निलंगा रोड