आद्यकवी मुकुंदराज समाधी
मुकुंदराज (जीवनकाल: इ.स.चे १२वे शतक) हे मराठी भाषेतील आद्यकवी होते. ज्ञानेश्वरांच्या जन्माच्या आधी मुकुंदराजांना समाधी घेऊन ७५ वर्षे झाली होती. मुकुंदराजांनी विवेकसिंधु या ग्रंथाद्वारे शंकराचार्यांच्या वेदांतावर निरूपणात्मक विवेचन केले आहे. शा.श. १११० सालच्या सुमारास लिहिला गेलेला मराठीतील हा आद्यग्रंथ त्यांनी बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई या आपल्या जन्मगावी लिहिला. या ग्रंथात एकूण अठरा ओवीबद्ध प्रकरणे आहेत.
मराठीचे आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी अंबाजोगाई शहराच्या पश्चिमोत्तर भागात जयंती नदीच्या काठी असलेल्या काड्यामध्ये आहे. खोल दरीमधील काड्यामध्ये असलेल्या नैसर्गिक गुहेमध्ये ही समाधी आहे. गुहा ८X१० फूट आहे. गुहेच्या मधोमध समाधी बांधलेली आहे. समाधीच्या उजव्या बाजूला नैसर्गिक झरा आहे. पावसाळ्यात त्याचे पाणी वाहत असते. समाधीच्या खाली प्रशस्त सभामंडप तयार केला आहे. दरीच्या बाजूने चिरेबंदी कठड्यानी हा सभा मंडप संरक्षित केला आहे. पश्चिमेस तीन ओवऱ्या आणि दोन खोल्यांचे बांधकाम केलेला आहे. तिथे समाधीच्या पुजाऱ्याचे निवासस्थान आहे. या ओवऱ्यांच्या बाजूला एक देवळीत पादुका चिन्हीत शिळा आहे ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज येथे येऊन गेल्याची खूण समजली जाते. अजान वृक्ष आणि वड पिंपळ अशा वृक्षांनी या स्थानावर सावली धरली आहे. समाधीपर्यंत जाण्यासाठी सुमारे एकशे पंचवीस चिरेबंदी पायऱ्या आहेत.
मुकुंदराजांनी वेदांताचे तत्वज्ञान मराठी भाषेमध्ये मांडण्यासाठी वेवेकसिंधू नावाचा आद्य मराठी ग्रंथ लिहिला. या ग्रंथात अंबाजोगाईचे वर्णन मनोहर अंबानगरी असे केलेले आहे
समाधी मंदिराच्या रमणीय परिसरात वनविभागाकडून घनवन आणि वेळुवनाची निर्मिती होत आहे. वन विभागाने विशेष लक्ष देऊन या परिसरात पयर्टकांसाठी व्ह्यूव पॉईंट्स उभारलेले आहेत. इथे मोरांची संख्या लक्षणीय आहे. याच परिसरात पायऱ्यांजवळ देवस्थानचे कार्यालय काही सातपुरुषांच्या समाध्या आहेत. मुकुंदराज भजनी मंडळाची एक विस्तीर्ण वास्तू येथे आहे.
त्यात विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मंदिरातील सभागृहांसोबतच समोरच्या पटांगणात मोठ्या सभागृहाचा समावेश आहे. तीन बाजूनी दोन मजली धर्मशालेची इमारत आहे. मुकुंदराज समाधी परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे. अनेक प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती या सापडतात. विविध प्रकारच्या सुमारे २०० पेक्षा जास्त पक्ष्यांच्या जाती या परिसरात पक्षीमित्रांनी नोंदवलेल्या आहेत. त्याविषयीची भोवताल नावाची एक पुस्तिकाही प्रकाशित केली गेली आ